नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील विविध भागात दहशत माजविणा-या गावगुंडास पोलिसांनी अखेर स्थानबंध्द केले आहे. संशयिताची नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नुतन पोलिस आयुक्तांनी आपल्या आगमनातच स्थानबंध्दतेला मंजूरी दिल्याने स्थानबध्दतेचा आकडा १४ वर पोहचला आहे.
यश राजेंद्र शिंदे (२४ रा.नागसेनवाडी,वडाळानाका हल्ली शिवदर्शन अपा.चर्च मागे वडाळा पाथर्डी रोड इंदिरानगर) असे स्थानबंध्द करण्यात आलेल्या गावगुंडाचे नाव आहे. शिंदे याची वडाळानाका,उपनगर,नागसेनवाडी,मुंबईनाका,इंदिरानगर आणि नजीकच्या परिसरात मोठी दहशत आहे. शस्त्राचा धाक दाखवून तो लुटमार व मारहाण करीत दहशत निर्माण करीत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर गेल्या दोन वर्षापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र तरीही त्याच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही.
गंगापूररोड परिसरात घरफोडी
नाशिक : गंगापूररोड परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे २५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिषा हरिराम चौधरी (रा.श्रमिक सोसा.बागुल हॉस्पिटल जवळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. चौधरी कुटूंबिय दि.२ ते ७ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
पोलिस त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करीत असतांनाच त्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणे सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याविरोधात उपनगर, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापूर आणि पंचवटी पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten