नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वरवंडी मार्गावर बैलगाडीवर भरधाव दुचाकी आदळल्याने ३६ वर्षीय चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीवर दुचाकीने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपक सुरेश धुळे (रा.वरवंडी ता.दिंडोरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दीपक गेल्या २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वरवंडी कडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर जात असतांना हा अपघात झाला होता. लिलकेवाडी येथील मनमौजी मिसळ हॉटेल परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाड्यावर भरधाव दुचाकी जावून आदळली होती.
हा अपघात चालकाचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाला होता. या अपघातात धुळे याच्या पोटास व डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास तात्काळ पंचवटीतील सुयोग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. गुरूवारी (दि.७) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत डॉ. राठी यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार फुलपगारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten