नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोक स्तंभ या वर्दळीच्या भागात वातावरण खराब असल्याची बतावणी करीत भामट्यांनी मदतीचा बहाणा करून वृध्दाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय देविदास दिघे (६२ रा.अपर्णा अपा.अभंगनगर नवीन आडगावनाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दिघे मंगळवारी (दि.५) अशोकस्तंभ भागात आले होते. सुपे हॉस्पिटल परिसरातून ते पायी जात असतांना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. संशयितांनी वातावरण खराब असल्याची बतावणी करीत दागिणे काढून ठेवण्याचा सल्ला दिला.
यावेळी भामट्यांनी रूमालात अंगठी बांधून पिशवीत ठेवण्यासाठी मदतीचा बहाणा करून सुमारे ४५ हजार ९०० रूपये किमतीची सोन्याची अंगठी हातोहात लांबविली. ही बाब घरी गेल्यानंतर दिघे यांच्या निदर्शनास आली असून अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten