नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे एक लाख ३८ हजाराचा ऐवज लंपास केला. या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी गंगापूर आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना शरणपूररोड भागात घडली. मोनिका प्रकाश शहा (रा.गजानन स्मृती अपा.कुलकर्णी कॉलनी,साधू वासवाणी रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शहा कुटूंबिय दि.१२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे,चांदीची भांडी व रोकड असा ६९ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गांगोडे करीत आहेत.
दुस-या घटनेत ध्रुवनगर येथील योगेश सुरेश घुगे (रा.इश्वर रो बंगलो,तुकाराम महाराज गार्डन जवळ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. घुगे कुटुंबिय मंगळवारी (दि.५) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे ६९ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सरनाईक करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten