नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील टागोरनगर भागात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. शंतनु सुनिल जाधव (२२ रा.शारदा संकुल टागोरनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. शंतनुच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
शंतनु जाधव या युवकाने बुधवारी (दि.६) रात्री अज्ञात कारणातून परिसरातील राज ज्वेलर्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली होती. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने भाऊ ऋषीकेश जाधव याने त्यास तात्काळ सुविचार हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. श्याम पाटील यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक गोसावी करीत आहेत.
दुसरी घटना रविवार कारंजा परिसरात गंगाघाट भागात घडली. येथे राहणा-या २३ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यश अनिल हजारी (रा.घर नं. १० गंगामंदिर सोसा,गंगाघाट रविवार कारंजा) असे मृत युवकाचे नाव आहे.
यश हजारी याने बुधवारी (दि.६) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकाला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच बहिण खुशी पुजारी यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten