नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीत वेगवेगळया भागात राहणा-या दोन मुली रविवार (दि.३) पासून बेपत्ता आहेत. त्यांचे कोणी तरी अपहरण केल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविल्याने अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चुंचाळे आणि अंबड लिंक रोड भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुली रविवार पासून बेपत्ता आहेत. घरात काही एक न सांगता त्या निघून गेल्या असून त्यांना कोणी तरी कसले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला आहे.
याबाबत अपहरणाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार चव्हाण व सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.
चार जणांच्या टोळक्याने केली एकास बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मागील भांडणाची कुरापत काढून चार जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना सावरकरनगर भागात घडली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने सदर इसम जखमी झाला असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललीत परशराम मेघानी,मयंक ललीत मेघांनी,मोनाली ललीत मेघानी व प्रांजल ललीत मेघानी (रा.भारत बेकरी,सावरकरनगर) अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत प्रदिप धर्मुमल बच्छाणी (३८ रा.आदित्य सोसा.डिसूजा कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. बच्छाणी गेल्या बुधवारी (दि.२९) रात्री भारत बेकरी भागात गेले असता ही घटना घडली. संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणात बच्छाणी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास जमादार झाडे करीत आहेत.
२७ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोडवरील तारवालानगर भागात राहणा-या २७ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शैलेशकुमार राचप्पा यणगुडे (रा.चिंतामणी नगर,आयोध्यानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. यणगुडे या युवकाने रविवारी (दि.३) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मित्र पदमाकर भुताळे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पोलिस शिपाई गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten