नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –औद्योगीक वसाहतीत पार्क केलेल्या अनेक चारचाकी वाहनांचे सायलेंसर चोरट्यांनी खोलून नेल्याचा प्रकार मंगळवारी (दि.३)सकाळी उघडकीस आला. प्लॅटीनम धातूसाठी चोरट्यांकडून सायलेन्सरवर डल्ला मारला जात असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी एका कार मालकाने दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाना बाबुराव गाडे (रा.दक्षिणमुखी मारूती मंदिराजवळ संभाजीनगर,अशोकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गाडे यांची मारूती इको कार एमएच १५ जीव्ही ०६४२ सोमवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी कारचे सुमारे ४० हजार रूपये किमतीचे सायलेन्सर खोलून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
सातपूर कॉलनीतील दक्षिणेश्वर मंदिर, संभाजी नगर, राधाकृष्णनगर, विश्वासनगर, श्रीकृष्णनगर, सोमेश्वर कॉलनी आदी भागातही सायलेन्सर चोरीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten