नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पाईप लाईनरोड भागात भरधाव अॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बारा वर्षीय बालक ठार झाला. या अपघातात मृत मुलाचे वडिल गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपेश दिपक निकम (१२ रा.साईकृपा अपा.सोमेश्वर कॉलनी,सातपूर) असे मृत बालकाचे नाव आहे. दिपेश रविवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास वडिल दिपक निकम यांच्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. सोमेश्वर कॉलनी कडून पाईपलाईनरोडने दोघे बापलेक एमजी रोडच्या दिशेने प्रवास करीत असतांना नगरसेविका नयना गांगुर्डे यांच्या संपर्क कार्यालय परिसरात भरधाव एमएच १५ एके ५९८५ या अॅटोरिक्षाने दुचाकीस धडक दिली.
या अपघातात निकम बापलेक गंभीर जखमी झाले होते. त्यांना श्री गुरूजी हॉस्पिटल येथे दाखल केले असता सोमवारी सकाळी डॉ.विक्रम सैनी यांनी दिपेश निकम या बालकास मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक झाडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten