नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – द्वारका भागात घरात शिरून २५ वर्षीय विवाहीतेचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुगेश जुगणू गोगलीया (रा.महालक्ष्मीचाळ कावेरी हॉटेल) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित आणि पिडीता एकमेकांचे परिचीत असून ते एकाच भागात राहतात.
२५ वर्षीय विवाहीत पीडिता सोमवारी घरात एकटी असल्याची संधी साधत संशयिताने हे कृत्य केले. घरात शिरून संशयिताने महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत सपकाळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten