नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भररस्त्यात गाडा लावून हात विक्री करणा-या दोन फळविक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. वर्दळीच्या रेल्वेस्टेशन भागात होणारी नियमीत वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमिवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
आरिफ इब्राहिम बागवान व इद्रीस इस्माईल बागवान अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या फळविक्रेत्यांची नावे आहेत. वर्दळीच्या रेल्वेस्टेशन भागातील आंबेडकर पुतळा आणि बसस्टॅण्ड जवळी हातोडा रिक्षा थांबा भागात रविवारी (दि.३) सायंकाळी दोघे फळविक्री करतांना मिळून आले. फळविक्रीचा हातगाडा रस्त्यावर लावून येणा-या जाणा-या वाहतूकीस अडथळा निर्माण होईल व मानवी आणि स्व:ताचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करतांना दोघे आढळून आल्याने त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस शिपाई भरत मोरे व वैभव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार दराडे व पोलिस नाईक देवरे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten