नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोड भागात विवाह सोहळयानिमित्त लॉन्समध्ये गेलेल्या महिलेच्या पर्समधील दागिण्यांसह रोकड व मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली. या घटनेत महिलेच्या पर्स मधील सुमारे ९२ हजाराचा मुद्देमाल भामट्यांनी लंपास केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्चना अविनाश पेठकर (रा.स्वामी समर्थ नगर,जत्रा हॉटेलमागे) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. पेठकर या शनिवारी (दि.२) नातेवाईकांच्या विवाह सोहळयायानिमित्त गंगापूररोडवरील वृंदावन लॉन्स येथे गेल्या असता ही घटना घडली. विवाहानंतर त्या शेजारी असलेल्या खुर्चीवर पर्स ठेवून अन्य महिलांशी गप्पा मारत बसलेल्या असतांना ही घटना घडली.
महिलांचे लक्ष नसल्याची संधी साधत अज्ञात भामट्याने पर्सची चैन उघडून सोन्याचे मंगळसुत्र,मोबाईल आणि रोकड असा सुमारे ९२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार झाडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten