नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोम्बींग मोहिमेत पोलिसांना शिवीगाळ करणा-या एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिमचंद्र रूपचंद चंद्रमोरे (४५ रा. मातोश्री रमाबाईनगर,गुलाबवाडी मालधक्कारोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत हवालदार संदिप पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशान्वये मंगळवारी (दि.२८) रात्री शहरात सर्वत्र कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले.
यावेळी पवार यांच्यासह त्यांचे सहकारी रमाबाई आंबेडकर नगर भागात मद्यपान केलेल्या इसमांवर कारवाई करीत असतांना ही घटना घडली. संतप्त संशयिताने पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करीत सरकारी कामात अडथळा आणला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten