नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फ्लाईट बुकींगचे टास्क पूर्ण करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भामट्यांनी त्यास पावणे सात लाख रूपयांना गंडविले असून याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणूक प्रकरणी सनी संजय घायाळ (३१ रा. गोदावरी हाईटस शिवाजीनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे.
घायाल गेल्या महिन्यात इंटरनेटवर पार्ट टाईम कामाचा शोध घेत असतांना टेलीग्राम आयडीच्या माध्यमातून भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी संशयितांनी विश्वास संपादन करीत घायाळ यांना एका वेबसाईटवर फ्लॉईट तिकीट बुकींगचे बनावट टास्क दिले होते. या टास्कसाठी घायाल यांना अनामत म्हणून ६ लाख ७२ हजार २१४ रूपयांची रोकड वेगवेगळया बँक खात्यात भरण्यास भाग पाडले.
१६ ते २६ ऑक्टोबर दरम्यान घायाळ यांनी रक्कम भरली असता ही फसवणूक झाली. महिना उलटल्याने घायाल यांनी अनामत रकमेसाठी संशयितांशी संपर्क साधला असता तो होवू न शकल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten