नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या एकास तब्बल ९४ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पार्ट टाईम जॉबच्या बदल्यात जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षल संजय शिंपी (रा. विखे पाटील शाळे जवळ वृदावननगर अंबड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिंपी गेल्या १५ नोव्हेंबर रोजी इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना टेलीग्राम आयडीधारक व व्हॉटसअपच्या माध्यमातून भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी संशयितांनी नोकरीच्या मागे न लागता गुंतवणुकीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखविले.
त्यासाठी शिंपी यांना टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण करण्यासाठी शिंपी यांनी संशयितांच्या सांगण्यावरून विविध बॅक खात्यात पैसे भरले असता ही फसवणुक झाली आहे. शिंपी यांनी १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान तब्बल ९४ लाख १३ हजार ४४१ रोकड भरूनही मुद्दलासह मोबदला न मिळाल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten