नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डेबीट कार्ड हरवणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. या हरविलेल्या डेबीट कार्डचा वापर करुन एकाने बँक खात्यातील २१ हजार रूपये लंपास केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फैसल मोहम्मद हुसेन गालीब (रा.गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. गालीब यांचे पोस्टात बॅक खाते असून, काही दिवसांपूर्वी त्यांचे डेबीट कार्ड हरविले होते. अज्ञात भामट्यांनी या कार्डचा सोमवारी (दि.२७) वापर केला.
औद्योगीक वसाहतीतील गरवारे पॉईट येथील इंडियन ऑईल कार्पोरेषन भागातील एटीएम बुथवरून भामट्यांनी कार्डचा वापर करून बॅक खात्यातील सुमारे २१ हजार रूपये परस्पर काढून घेतले. याबाबत संदेश प्राप्त होताच गालीब यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten