नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये पावणे तीन लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सातपूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक घरफोटी भरदिवसा झालेली आहे.
पहिली घटना पाथर्डी फाटा भागात घडली. संतोष यशवंत वालझाडे (रा. दिपज्योती रो हाऊस,मुरलीधर नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वालझाडे कुटुंबिय मंगळवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ६७ हजार ५०० रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे चोरून नेले. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
सातपूर औद्योगीक वसाहतीत राहणारे मोहसीन बशीर खाटीक (रा.साईराज हाईटस,स्वामी समर्थ केंद्रामागे श्रमिकनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खाटीक कुटूंबिय दि.२३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून बेडरूमधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे २ लाख ३ हजार ९०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten