नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीचे सत्र सुरु असतांना आता चोरट्यांनी थेट मंदिरात चोरी करणे सुरु केले आहे. नाशिकच्या प्रसिध्द काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा भागात असलेल्या दत्त मंदिरात ही चोरी झाली आहे. या मंदिरातून चोरट्यांनी सुमारे ४० हजार रूपये किमतीचे चांदीचे अलंकार चोरून नेले. त्यात मुर्तीवरील चांदीचा मुकूट, छत्री, चिन्ह,पताका व तांब्याचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय दिनकर देशपांडे (रा.ठाणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा भागात असलेल्या दत्त मंदिरात ही घटना घडली. गुरूवारी (दि.२३) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दत्तमुर्तीवरील ४०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकूट १५० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री ४५० ग्रॅम वजनाचे चिन्ह व पताका व २०० गॅ्रम वजनाचा चांदीचा तांब्या आणि तबकडी असा सुमारे ४० हजाराचा ऐवज चोरून नेला.
ही बाब दुस-या दिवशी सकाळी उघडकीस आली. पुजारी देशपांडे सकाळच्या सुमारास मंदिरात गेले असता चोरीचा हा प्रकार समोर आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गावित करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten