नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फायनान्स कंपनीच्या माध्यातून खरेदी केलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जाची परतफेड न केल्याने कंपनीच्या वसूली अधिका-यांनी चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी चौदा जणांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रावसाहेब पुंजा गायकवाड (रा.कोकणगाव ता.दिंडोरी) व अन्य १३ जण अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी जयपाल गुलाबसिंग गिरासे (रा.पेठेनगर,इदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयितांनी गेल्या तीन वर्षात एचडीबी फायनान्स सर्व्हीसेस या कंपनीकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी ४७ लाख ८१ हजार ७६ रूपयांचे कर्ज घेतले होते.
मात्र कर्जाची परतफेड केली नाही त्यामुळे वसूली अधिका-यांनी चौकशी केली असता संशयितांनी टॅक्टरची परस्पर विक्री केल्याचे समोर आले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten