नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी मंगळवारी (दि.२१) आत्महत्या केली. त्यातील दोन विवाहीतांनी गळफास लावून घेत तर एकाने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. मात्र एका विवाहीतेने सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरकडील मंडळीने केला आहे. याबाबत गंगापूर,सातपूर आणि उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गंगापूररोड भागातील रोशनी रविंद्र पवार (२३ रा.सरोज अव्हेन्यू,ध्रुवनगर) या विवाहीतेने मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच दिर मयुर पवार यांनी त्यांना तातडीने नजीकच्या संकल्प हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दरम्यान मृत विवाहीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार हुंड्याची रक्कम दिली नाही या कारणातून तिचा सासरच्या मंडळीकडून मानसिक व शारिरीक छळ सुरू होता. यातून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप केला असून याप्रकरणी पती रविंद्र पवार,भारती पवार,दत्तू पवार (रा.सदर) व सायली पाटील आदींविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.
दुसरी घटना जयभवानी रोड भागात घडली. योगिता राजेंद्र देवरे (२३ रा. अक्षदा पार्क हरिओम नगर) या विवाहीतेने मंगळवारी दुपारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती राजेंद्र देवरे यांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.
तिसरी घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. विलास बबन बोबडे (३६ रा.शिवप्रसाद रो हाऊस, स्वामी समर्थ केंद्राजवळ श्रमिकनगर) यांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून मद्याच्या नशेत विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पत्नी सविता बोबडे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten