नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरूणीवर एकाने दोन वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गर्भपातानंतर संशयिताने नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश राजेंद्र कुलकर्णी (२३ रा.अंबड) असे संशयिताचे नाव आहे. भारतनगर भागात राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे मित्र मैत्रीण असून२०२१ मध्ये संशयिताने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. यावेळी त्याने लग्नाचे आमिष दाखवत पीडितेच्या घरी तसेच सिडकोतील हॉटेल चंद्रलोक आणि इंदिरानगर येथील हॉटेल असोशिया सयाजी येथे घेवून जात तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.
हा प्रकार सलग दोन वर्ष सुरू राहिल्याने युवती गर्भवती राहिली असता संशयिताने बळजबरीने तिचा गर्भपात केला. त्यानंतर पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता संशयिताने नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten