नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाच्या ऐवज चोरीला गेला. या दोन घरफोडीपैकी एक घरफोडी भरदिवसा झाली. याप्रकरणी सातपूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घरफोडी पाथर्डी फाटा भागात घडली. पांडूरंग नामदेव जाधव (रा.विक्रीकर भवन जवळ,आनंदनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव कुटूंबिय बाहेरगावी गेलेले असतांना रविवारी (दि.१) सकाळी ही घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे ४६ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. येथे भरदिवसा घरफोडी झाली. याबाबत यशवंत मोतीराम बंगाळ (रा.सिध्दीविनायक अपा. राधाकृष्णनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बंगाळ कुटुंबिय गेल्या शनिवारी (दि.३०) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ३९ हजार ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten