नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबक नाका सिग्नलकडून मुंबई नाक्याकडे जाणा-या रस्त्यावर वाहनाला धडक देऊन शिवीगाळ व दमदाटी करीत दोघा तरूणांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत दोघे तरूण जखमी झाले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर धोंडीबा कुंभार (रा.सावरगाव ता.आष्टी जि.बिड), शुभम सुभाष भामरे उर्फ रिंक्या भामरे (२६) व रोशन भगवान माने (२२ रा. दोघे सहवासनगर,नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी अंकुश जयवंत किणी (३५, रा. राजीवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. किणी आणि रुपेश प्रभाकर चौधरी हे दोघे या घटनेत जखमी झाले.
किणी यांनी दिलेल्या फियार्दीनुसार गुरूवारी (दि.९) रात्री त्र्यंबकनाका सिग्नलकडून मुंबई नाक्याच्या दिशेने चारचाकीतून प्रवास करीत असतांना एमएच ०२ जेपी ६४४७ या कारमधून आलेल्या टोळक्याने वाहनास धडक दिली. याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने शिवीगाळ व दमदाटी करीत दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत किणी व चौधरी हे दोघे जखमी झाले असून,अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten