नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंजमाळ भागात घरखाली करण्याच्या वादातून तिघांनी महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत काही तरी हत्याराने वार करण्यात आल्याने महिला जखमी झाली असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजुम खान,जरीन खान व नासिर शेख (रा.तिघे खडकाळी) अशी महिलेवर प्राणघातक हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी ईशा जुनेद शेख (२७ रा. संपत गिरणीजवळ,पंचशिलनगर गंजमाळ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
ईशा शेख व संशयितांमध्ये घरखाली करण्याच्या कारणातून वाद आहे. रविवारी (दि.५) सायंकाळी संशयितांनी पीडित महिलेचे घर गाठून घरखाली केले नाही या कारणातून वाद घालत शिवीगाळ व दमदाटी करीत तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका संशयिताने जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने हल्ला केला. यात महिला जखमी झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten