नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळालीगावात जुन्या वादाची कुरापत काढून तीन जणांच्या टोळक्याने दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत काही तरी हत्याराने वार करण्यात आल्याने दोघे मित्र जखमी झाले असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिब्बान शेख,हाजिम शेख व बॉबी सय्यद अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत रत्नाकर देवरे (१७ रा.महादेव मंदिरा समोर वडारवाडी,देवळाली गाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. अनिकेत देवरे, अरमान शेख व आनंदा नामक मित्र रविवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळया मागील बाजूस असलेल्या किस्मत हेअर सलून भागात उभे असतांना संशयित त्रिकुटाने त्यांना गाठले.
यावेळी संशयितांनी मागित भांडणाची कुरापत काढून अरमान व आनंदा यांना शिवीगाळ करीत त्यांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका संशयिताने जीवे मारण्याच्या उद्देशाने दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten