नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुली गुरूवारपासून बेपत्ता झाल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. याप्रकरणी गंगापूर व आडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलींना कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना गंगापूररोडवरील भोसला मिलटरी स्कूल भागात घडली. या भागात राहणारी मुलगी गुरूवारी सायंकाळ पासून बेपत्ता आहे. तिलाही कुणी तरी पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक बागुल करीत आहेत.
दुस-या घटनेत माडसांगवी येथील टोलनाका पाट किनारी झोपडपट्टीत राहणारी अल्पवयीन मुलगी गुरूवारी सायंकाळी कुणासही काही एक न सांगता घराबाहेर पडली ती अद्याप परतली नाही. तिला कुणी तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten