नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तांदूळ खरेदी विक्री व्यवसायात बंगालच्या व्यावसायीकाने शहरातील निर्यातदारास साडे आठ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरजकुमार चौधरी (रा.सिलीगुडी प.बंगाल) असे फसवणूक करणा-या संशयित व्यापा-याचे नाव आहे.
या फसवणूक प्रकरणी नारायण बापू चांदवडकर (रा.श्रध्दा विहार कॉलनी,इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. चांदवडकर यांचा एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. संशयित व्यावसायीकाने गेल्या ऑगष्ट महिन्यात चांदवडकर यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्याने तांदूळ खरेदी करावयाचा असल्याचे सांगून चांदवडकर यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले.
त्यानुसार चांदवडकर यांनी ८ लाख ५२ हजार १०० रूपयांची गुंतवणुक केली. मात्र त्यानंतर संशयिताने अप्रामाणिकपणा व विश्वासघात करून प्रत्यक्षात तांदुळाची खरेदी विक्री न केल्याने चांदवडकर यांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten