नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठफाटा भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ६८ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. राजेंद्र मुरलीधर तरटे (रा.आदर्शनगर,रामवाडी) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरटे गेल्या बुधवारी (दि.६) पेठफाटा भागातून आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. पेठकर प्लाझा या इमारतीसमोर भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार दत्तू शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten