नाशिक (इंडिय दर्पण वृत्तसेवा) – आडगाव शिवारातील इच्छामणी नगरमध्ये आज सकाळी पतीने पत्नीची हत्या करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विशाल निवृत्ती घोरपडे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून प्रिती विशाल घोरपडे असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. या हत्येमुळे नाशिक शहरासह इच्छामणी नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात खूनाचे सत्र सुरूच असतांना ही कौटुंबिक घटना समोर आली आहे. सकाळी विशाल घोरपडे याने आपली पत्नी प्रिती ही गाढ झोपेत असतांना तिच्या डोक्यात मुसळी टाकत तिची हत्या केल्याचे बोलले जात आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर विशाल घोरपडे याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
ही घटना समजताच घोरपडे कुटुंबातील सदस्य घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे. पत्नीची हत्या करुन विशाल घोरपडे याने आत्महत्या का केली याचे याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आली नाही.
A husband committed suicide by hanging himself after killing his wife in Nashik