नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६६ हजाराचे ऐवज लंपास केले आहे. कमोदनगर भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह चांदीचे दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंक्य सुधाकर धारणकर (रा.प्रभुलिला अपा.कमोदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. धारणकर कुटुंबिय मंगळवारी (दि.१९) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड आणि चांदीचे अलंकार असा सुमारे ६६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
२४ वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २४ वर्षीय युवकाने औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक भिमराज प्रधान (रा.पूजा पेट्रोल पंपामागे,कार्बननाका) असे मृत युवकाचे नाव आहे. दीपकच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपक प्रधान याने बुधवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडिल भीमराज प्रधान यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten