नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सिडकोतील एकास घरी बसून पैसे कमविण्याचे आमिष दाखवत भामट्यांनी तब्बल साडे अठरा लाखास गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्वीजय सुधाकर कासार (३९ रा. गणेश चौक,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
खासगी नोकरी करणारे कासार गेल्या महिन्यात इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना ८७६८०८२३२५ या व्हॉटसअप धारकाने त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी कासार यांना पार्टटाईम बिझनेसची माहिती देण्यात आली. याबरोबरच गुंतवणुक केल्यास अधिकचा फायदा होईल असा सल्ला देण्यात आला. कासार यांचा विश्वास बसल्याचे लक्षात येताच भामट्यांनी विविध कारणे सांगून त्यांना येस बँक,पंजाब नॅशनल बँक,आयसीआयसीआय बँक तसेच युपीआय आणि टेलीग्रामच्या माध्यमातून त्यांना पैसे भरण्यास भाग पाडले.
१८ ऑगष्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान कासार यांनी तब्बल १८ लाख ५३ हजार ६३२ रूपये भरले मात्र त्यानंतर भामट्यांचा संपर्क तुटल्याने आर्थीक फसवणुक झाल्याचे लक्षात येताच कासार यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten