नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर झोपडपट्टीत पैशांसाठी मुलाने आईवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने आई जखमी झाली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मुलाविरूध्द खूनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रविण परशुराम गालट (२८ रा.क्रांतीनगर,झोपडपट्टी उंटवाडीरोड) असे आपल्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी काजल आसरकर यांनी तक्रार दाखल केली आहे. या हल्यात जानकी परशुराम गालट (४५) या जखमी झाल्या आहेत.
गालट मायलेकामध्ये गुरूवारी (दि.२८) सायंकाळी पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. आईने पैसे दिले नाही या कारणातून संतप्त मुलाने आपल्या आईला शिवीगाळ करीत तुला जीवंत सोडत नाही असे म्हणून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत जानकी गालट ही महिला गंभीर जखमी झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten