नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – द्वारका भागात पैसे पडल्याची बतावणी करीत भामट्यांनी कारमधून मोबाईल व रोकड असलेली बॅग लंपास केली, घटनेत ४० हजाराच्या मुद्देमालावर भामट्यांनी चोरुन नेला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश रतनराव पाटील (रा.महाळूंगे, पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील मंगळवारी (दि.२६) कामानिमित्त शहरात आले होते. दुपारच्या सुमारास ते परतीच्या प्रवासासाठी द्वारका भागात आले असता ही घटना घडली. द्वारका भागातील गर्दीतून ते आपली कार पुढे नेत असतांना चालकाच्या बाजूने आलेल्या एकाने त्यांना जमिनीवर पैसे पडले असल्याची बतावणी केली.
त्यामुळे ते कार खाली उतरून पाहणी करीत असतांना दुसºया बाजूने उभ्या असलेल्या भामट्याने कारचा दरवाजा उघडून मोबाईल व ३० हजाराची रोकड असलेली हॅण्डबॅग असा सुमारे ४० हजाराचा ऐवज पळवून नेला. ही बाब निदर्शनास येताच पाटील यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten