नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वावर ठेवणा-या तडीपाराला पोलिसांनी गजाआड केले आहे. हद्दपारीची कारवाई केलेली असतांना तो शहरात फिरत होता. दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने मखमलाबाद येथील विद्यानगर भागात ही कारवाई केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य रामदास पिंगळे (२१ रा.गंगोत्री हाईटस घाडगे मळयाजवळ विद्यानगर) असे संशयित तडिपाराचे नाव आहे. पिंगळे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलिसांनी त्यास शहर व जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिस त्याच्या मागावर असतांना मंगळवारी (दि.२६) मखमलाबाद शिवारातील विद्यानगर भागात त्यास दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. याबाबत पोलिस शिपाई तेजस मते यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलिस नाईक वसावे करीत आहेत.
३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३७ वर्षीय व्यक्तीने सोमवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. जेलरोड परिसरातील शक्तीनगर भागात ही घटना घडली. सागर विठ्ठल आंबरे (रा.कोणार्क विहार हौ.सोसा.शक्तीनगर) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. आंबेर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आंबरे याने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत भाऊ अविनाश आंबरे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक कुºहाडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten