नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिसांनी तीन जणांवर हद्दपारीची कारवाई केल्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. औद्योगीक वसाहतीसह सिडको परिसरात दहशत निर्माण करणा-या लक्ष्मण उर्फ लक्ष्या राजेंद्र कोळी (२१ रा.घरकुल योजना,चुंचाळे शिवार), निखाल सुभाष लाड (२२ रा.महाकाली चौक,पवननगर सिडको) व सतिष बबन माने (२१ रा.माऊली चौक,दत्तनगर) यांना हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ २ च्या पोलिस उपायुक मोनिका राऊत यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
या तिघांची परिसरात मोठी दहशत असून फौजदारी कारवाई नंतरही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्याने पोलिसांनी आता थेट हद्दपारीचे शस्त्र हाती घेतले आहे. संशयितांविरोधात एकापेक्षा अनेक गुन्हे दाखल असून आपली दहशत कायम राहवी यासाठी त्यांचा उपद्रव वाढल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
अंबड पोलिस ठाणे आणि चुंचाळे पोलिस चौकीकडून सादर करण्यात आलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावास आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूरी देण्यात आली असून, संशयितांविरोधात तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात परिमंडळ २ हद्दीतून ५२ लोकांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली असून, या कारवाईचे उलंघन करणा-या १० गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहरात वेळोवेळी तडिपार चेकीग करण्यात येत असून विनापरवानगी वावर ठेवणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten