नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंगल्याची परस्पर खरेदी विक्री केल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही फसवणूक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ साहेबराव नजन, सतिश सुभाष पुरोहित, महेंद्र विनायक पानकर व प्रशांत बडगुजर अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी विशाल सोमनाथ गाढवे (२६ मुळ रा. कोपरगाव जि.अहमदनगर,हल्ली दत्तनगर अंबड लिंकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. आडगाव शिवारातील गट नं. ३७०-३ मधील राजाराम पोतदार यांचे नावे असलेला १५३.१९ चौमि क्षेत्रफळ बांधीव बंगला हडप करण्याच्या उद्देशाने संशयितांनी १३ फेब्रुवारी २०२० रोजी हा उद्योग केला आहे.
राजाराम कडूशेठ पोतदार या नावाने त्र्ययस्त व्यक्ती उभी करून तसेच बनावट कागदपत्र सादर करून संशयितांनी परस्पर खरेदी विक्री बाबत नोंदणी करून गाढवे व अन्य लोकांची फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten