नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेन मुंबई व मिलन नावाचा मटका जुगार खेळणा-या चौघांना सोमवारी गजाआड केले आहे. हे वेगवेगळ्या भागात जुगार खेळत होते. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी भद्रकाली आणि पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जहिद लतीफ खान (रा.मुल्तानपुरा मशिद जवळ,भद्रकाली),नवाज शेरू पठाण (रा.सहकारनगर भिमवाडी),अरबाज रफिक खान (रा.भारतनगर,वडाळारोड) व शेख रसूल शेख निजामुद्दीन (रा.वाल्मिकनगर,पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत.
भद्रकालीतील फुले मार्केट येथील मच्छीबाजार परिसरात काही लोक उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी पोलिसांनी धाव घेत छापा टाकला असता जहिद खान,नवाज पठाण व अरबाज खान हे अंक आकड्यावर पैसे लावून मिलन नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस शिपाई निलेश विखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक साळुंखे करीत आहेत.
दुसरी कारवाई वाल्मिकनगर भागात करण्यात आली. राम मंदिर भागातील सुलभ शौचालय परिसरात शेख रसूल शेख निजामुद्दीन (रा.वाल्मिकनगर,पंचवटी) हा लोकांकडून अंक आकड्यावर पैसे लावून घेत मेन मुंबई नावाचा मटका जुगार खेळवितांना मिळून आला. संशयितांच्या ताब्यातून ६१० रूपयांची रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस नाईक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten