नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खंडणी न दिल्याने दोघांनी बेदम तरुणास बेदम मारहाण केली आहे. रस्त्यावर वाहन पार्क केल्याच्या मोबदल्यात युवकाकडे ही खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश राऊत व अन्य एक अशी संशयित खंडणीखोरांची नावे आहेत. याबाबत सागर कैलास शेजवळ (२६ रा.मथुरारोड पांडूरंगनगर,विहीतगाव ता.जि.नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेजवळ सोमवारी (दि.२५) आपल्या घराबाहेरील रस्त्यावर लावलेली दुचाकी काढत असतांना ही घटना घडली.
दोघा संशयितांनी त्यास गाठून तू बाहेर गाडी लावतो त्याचे मला पैसे दे अशी बतावणी करीत खंडणीची मागणी केली. यावेळी शेजवळ याने खंडणी देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यास शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. यावेळी संशयितांनी शेजवळ यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान केले असून अधिक तपास उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten