नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शालिमार भागात कार अडवून चालकाशी हुज्जत घालत बंटी बबलीने मोबाईल लंपास केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नईम सुलेमान सय्यद (रा.कामत हॉटेल मागे,नाशिक पुणा रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
सय्यद सोमवारी (दि.२५) कामानिमित्त शालिमार भागात आले होते. शिवसेना भवन समोरून ते आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. अनोळखी महिला व पुरूषाने कार अडवून कुठलेही कारण नसतांना त्यांच्याशी नाहक हुज्जत घातली. यावेळी संशयितांपैकी एकाने कारचा दरवाजा उघडून दरवाजाच्या पाकिटात ठेवलेला महागडा मोबाईल हातोहात लांबविला. अधिक तपास पोलिस नाईक संदिप आहेर करीत आहेत.
………..
सिडकोत घरफोडीत चोरट्यांनी ४१ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक : सिडकोतील महाकाली चौकात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४१ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याच्या दागिण्यांसह चांदीच्या भांड्याचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधाकर अर्जुन खोक (रा.रूतबा मेन्स वेअर शेजारी,महाकाली चौक साईबाबानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खोक कुटूंबिय शुक्रवारी (दि.२२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिणे व चांदीचे भांडी असा सुमारे ४० हजार ९९० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten