नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १६ वर्षीय मुलाचा नदी पात्रात मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. पाय घसरून नदीपात्रात पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात असून, याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आनंद सिध्दार्थ शेजुळे (रा.मनपाच्या जागेत आयचितनगर,वसुंधरा सोसा.जवळ गंगापूररोड) असे मृत मुलाचे नाव आहे. शेजुळे हा शनिवार (दि.२३) पासून बेपत्ता होता. सकाळच्या सुमारास कुणासही काही एक न सांगता तो घराबाहेर पडला होता. उशीरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटूंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे आई मंगल शेजूळे यांनी गंगापूर पोलिसात धाव घेत मिसींग दाखल केली होती.
सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह गोदावरी नदी पात्रावरील कटारिया ब्रिज परिसरातील रोपवाटीका नर्सरी भागात आढळून आला असून, नदीपात्रात पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. याबाबत वडिल सिध्दार्थ शेजुळे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक गवे करीत आहेत.
……….
४४ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ४४ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना जेलरोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टीत घडली. या इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कृष्णा निवृत्ती बेनवाले (रा.आम्रपाली झोपडपट्टी,जेलरोड) असे मृत इसमाचे नाव आहे. बेनवाले यांनी सोमवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा सचिन बेनवाले याने त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ.भावेश सोनवणे यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten