नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्क्रिन शेअरींग अॅपच्या माध्यमातून अॅक्सेस घेत एका भामट्याने नाशिकच्या महिलेला चार लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन ओळख निर्माण करून ही फसवणूक करण्यात आली आहे. स्क्रिन शेअरींग अॅपच्या माध्यमातून अॅक्सेस घेत बँक खात्यावरील रक्कम परस्पर वर्ग करुन घेतली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिनाक्षी प्रसन्ना नायक (मुळ रा.ओडीसा हल्ली म्हसरूळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नायक यांच्याशी गेल्या मे महिन्यात ८२५०९०४१०४ या क्रमांकावरून भामट्यांनी संपर्क साधला होता. इंडिया नेन्डस या लोन अॅपमधून बोलत असल्याची बतावणी करीत नायक याच्याशी ओळख निर्माण करीत भामट्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून वेळोवेळी संपर्क साधला. या काळात नायक यांच्या बँक खात्याचा स्क्रिन शेअपरींग अॅपच्या माध्यमातून अॅक्सेस घेवून हा गंडा घालण्यात आला.
भामट्यांनी एका रात्री नायक यांच्या बँक खात्यातील ३ लाख ९८ हजार ८२७ रूपयांची रक्कम इंटरनेटच्या माध्यमातून विविध बँक खात्यात वर्ग करून लांबविली असून ही बाब निदर्शनास येताच नायर यांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten