नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीज कंपनीच्या भरारी पथकाने घरगुती मिटरमध्ये फेरफार होत असल्याचे शोधून वीज चोरी केल्याचा प्रकार उघड केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फारूख अहमद बशीर शेख व राज मनोहर चौधरी (रा. दोघे घर नं. १२८६, भद्रकाली पोलिस स्टेशन मागे,खडकाळी) अशी विजचोरी करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीचे राजेश श्रीनाथ (रा.काठेगल्ली) यांनी तक्रार दाखल केली आहे. खडकाळी भागात वीजचोरी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
त्यानुसार भरारी पथकाने रविवारी (दि.२४) शोध मोहिम राबविली असता संशयितांच्या घरगुती मिटरमध्ये फेरफार करण्यात आल्याचे समोर आले. संशयितांनी ७५६५३८९२ या मिटरचे सिल तोडून त्यात फेरफार करून सुमारे १३ हजार ९६२ रूपये किमतीची ९५५ युनिट विजेची चोरी केल्याचे पुढे आले असून अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten