नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात दोन घरफोडी करत ६६ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ आणि आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी या दोन्ही घरफोड्या झाल्या.
पहिली घटना अमृतधाम भागात घडली. संत सावतानगर भागात राहणा-या कृष्णा ज्ञानेश्वर असोले (रा.रामगंगा बंगला) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. असोले शुक्रवारी रात्री अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप बनावट चावीने उघडून घरातील लॅपटॉप व टॅब असा सुमारे ३२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राजुळे करीत आहेत.
दुसरी घरफोडी पेठरोडवरील तवलीफाटा भागात झाली. येथील ज्ञानेश्वर शंकरराव शिरसाठ (रा.हिरा शंकर निवास,रामनगर तवलीफाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिरसाठ कुटुंबिय शुक्रवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड, सोन्याचांदीचे दागिणे तसेच हॉलमधील टिव्ही असा सुमारे ३४ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोज करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten