नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खोडेनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. अमीन सलीम शहा (रा.अब्दूल अपा.खोडेनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहा रविवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काम करीत असतांना ही घटना घडली. अचानक तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले होते.
या घटनेत गंभीर जखमी झाल्याने ठेकेदार अजहर अन्सारी यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सायंकाळी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक भगवान भोये करीत आहेत.
शस्त्र बाळगणा-या तरूणावर पोलिसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शस्त्र बाळगणा-या तरूण पोलिसांनी कारवाई केली आहे. या संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयत्यासह गुप्ती जप्त करण्यात आली आहे. सलमान स्वालेह खान (१९ रा.चाचा टिंबर लकडावाला दुकानासमोर,अजमेरीनगर खाडी अंबड) असे संशयित शस्त्रधारीचे नाव आहे.याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
संशयिताकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास पोलिसांनी धाव घेत ही कारवाई केली. पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता व पाईपात लपविलेली धारदार गुप्ती हस्तगत केली असून याबाबत हवालदार चंद्रकांत गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी शस्त्र बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten