नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपीक पदासाठी असलेल्या ऑनलाईन परिक्षाकेंद्रावर एकाने मोबाईलसह इलेक्ट्रीक डिव्हाईस सॅण्डेलमध्ये लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जालना जिह्यातील तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले सुरज विठ्ठलसिंग जारवाल (२३ रा.जारवालवाडी – सागरवाडी पो.धासला ता.बदनापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
तलाठी भरती पेपर फुटी पाठोपाठ हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने शुक्रवारी (दि.२२) कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपीक या पदासाठी राज्यभरात ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली. शहरातही विवीध केंद्रांवर ही परिक्षा पार पडली. मात्र म्हसरूळ परिसरातील पुणे विद्यार्थीही गृह या महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.
ऑनलाईन परिक्षा असल्याने केद्रावर सर्वच परिक्षार्थींची अंगझडती घेण्यात आली. यावेळी पर्यवेक्षकांच्या नजरेतून संशयित सुटला नाही. अंगझडतीत संशयिताच्या पायातील सॅण्डलला चोरकप्पा असल्याचे पुढे आले. या चोरकप्यात मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस आढळून आले. ही बाब पर्यवेक्षकांनी परिक्षा प्रमुख्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी ऋषीकेश गोकुळ कांगणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten