नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने तब्बल सव्वा चोवीस लाख रूपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य मनोहर अहिरराव (२६ रा.आयोध्यानगरी,अमृतधाम) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आदित्य आहिरराव हा तरूण गेल्या महिन्यात इंटरनेटवर ऑनलाईन पार्टटाईम बिझनेसचा शोध घेत असतांना सायबर भामट्यांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. ९१९२६३८५५८८१ या मोबाईल धारकाने इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून अहिरराव यांचा विश्वास संपादन करून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
त्यामुळे अल्पवधीतील श्रीमंतीच्या नादात ही फसवणुक झाली असून, वेगवेगळया बँक खात्यावर व युपीआय आयडीच्या माध्यमातून अहिरराव यांना पैसे भरण्यास भाग पाडले. अहिरराव यांनी दि.२६ ते ३१ ऑगष्ट दरम्यान तब्बल २४ लाख २५ हजार ५०५ रूपयांची गुंतवणुक केली असून, संशयितांचा सपर्क तुटल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten