नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात शुक्रवारी वेगवेगळया भागातील दोन ठिकाणी घरफोडी करत चोरट्यांनी सुमारे सव्वा पाच लाखाच्या ऐवज लंपास केला. या दोन्ही ठिकाणी चोरटयांनी रोकड व सोन्याचांदीचे दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी पंचवटी आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना दोनवाडे रोड भागात घडली. याबाबत नामदेव शिवराम आव्हाड (रा.आव्हाड वस्ती,दोनवाडेरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. आव्हाड कुटूंबिय शुक्रवारी दुपारी घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील रोकड, सोन्याचांदीचे दागिणे व मोबाईल असा सुमारे १ लाख ५४ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनोने करीत आहेत.
दुस-या घटनेत हिरावाडीतील दत्ता एकनाथ गरड (रा.गोकुळग्राम अपा.बनारसीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गरड कुटुंबिय शुक्रवारी दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा मुख्य दरवाजा कश्याने तरी तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ६१ हजार ६६८ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
……..