नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव शिवारातील स्वामीसमर्थ नगर भागात गावठी कट्टा बाळगणा-या दोन युवकांना पोलिसांनी गजाआड केले आहे. संशयितांच्या ताब्यातून काडतुसांसह पिस्तूल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्शन उर्फ डोन्या भारत किर्तने (२२ रा.देवी मंदिरामागे,नांदूरनाका) व पियुश अशोक येवले (१९ रा.आयोध्यानगरी,अमृतधाम) अशी अग्नीशस्त्र बाळगणाºया संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास संशयितांकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात सुमारे २५ हजार रूपये किमतीचा व काडतुसांनी भरलेला गावठी पिस्तूल मिळून आला. याबाबत अंमलदार विलास चारोस्कर यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten