नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहिपूल भागात गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील पर्स चोरून नेल्याची घटना घडली. पर्समध्ये रोकडसह महत्त्वाचे कागदपत्र असा सुमारे २३ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पा दिनेशकुमार विश्वकर्मा (रा.ध्रुवनगर,गंगापूर रोड ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पुष्पा विश्वकर्मा या गेल्या रविवारी (दि.१७) खरेदीसाठी दहिपूल भागात गेल्या होत्या. गर्दीत खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीची चैन उघडून हॅण्ड पर्स चोरून नेली.
या पर्स मध्ये रोकड व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे २३ हजार २०० रूपयांचा ऐवज होता. अधिक तपास पोलिस नाईक थेटे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten