नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोमेश्वर कॅालनी भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्र लंपास केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिरूध्द गोयाधर पल्लई (२१ रा.हनुमान मंदिराजवळ,सोमेवर कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पल्लई कुटुंबिय गेल्या सोमवारी (दि.४) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमध्ये ठेवलेला लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगमध्ये लॅपटॉपसह महत्वाचे कागदपत्र असा सुमारे ३१ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
..