नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑनलाईन वस्तू खरेदी – विक्रीवर जास्तीच्या कमिशनचे आमिष दाखवून एकाची पावणे दोन लाख रूपयाची फसवणूक करण्यात आली आहे. कमिशनसह गुंतवणुकीची रक्कमही पदरी न पडल्याने तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागरप्रसाद सुरेंद्र रॉय (३६ रा.महाजननगर,जय हिंद कॉलनी,बुरकुले हॉल मागे,अंबड लिंकरोड) यांना याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रॉय मार्केटीग व्यवसायाबाबतची इंटरनेच्या माध्यमातून पडताळणी करीत असतांना ९८८६९४१५२६ या क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. वस्तू खरेदी विक्रीच्या माध्यमातून त्यांना जास्तीच्या कमिशनचे आमिष दाखविण्यात आले. टेलीग्राम आणि व्हॉटसअपच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या भामट्यांनी विविध वस्तू विक्रीची माहिती देवून त्यातून कसे जास्तीचे कमिशन मिळेल याबाबतची माहिती देत रॉय यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गेल्या जुलै महिन्यात रॉय यांना एक लिंक पाठविण्यात आली.
या लिंकवर वस्तू खरेदीसाठी रॉय यांना पैसे पाठविण्यास भाग पाडले. १ लाख ६९ हजार १०० रूपयांची रक्कम पाठविल्यानंतर विविध प्रकारच्या वस्तू रॉय यांना मिळाल्या. अल्पावधीत विविध प्रकारच्या वस्तू रॉय यांनी विक्री करून ठरल्याप्रमाणे वस्तू विक्रीची रक्कम संबधितांना पाठवून दिल्याने ही फसवणुक झाली. रक्कम पदरात पडताच भामट्यांनी संपर्क तोडला असून, चार महिने उलटूनही कमिशन आणि गुंतवणुक अशी सुमारे २ लाख ७५ हजाराची रक्कम मिळाली नाही त्यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात येताच रॉय यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten